नितीन वीर

मंगलवार, 24 मई 2016

wel come

सुस्वा गतम
प्रस्तुतकर्ता Niteen veer पर 5:03 am कोई टिप्पणी नहीं:
इसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें! X पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें
नई पोस्ट मुख्यपृष्ठ
सदस्यता लें संदेश (Atom)

तूर लागवड

सध्या खरिपात कोणती पिके घ्यावीत या बाबतीत सर्वत्र नियोजन चालू आहे. चालू वर्षी तुरीला प्रतिक्विंटलला साडेनऊ ते दहा हजार रुपये दर मिळाला. यामुळे अनेक शेतकरी रोपवाटिका तंत्रज्ञानावर आधारित तुरीची लागवड करण्याबाबत उत्सुक आहेत. यात ६ बाय २ किंवा ५ बाय २.५ किंवा ७ बाय १.५ किंवा ६ बाय १.५० फूट अशा अंतरावर लागवडीचे नियोजन सुरू आहे. पहिली बाब म्हणजे पाणी असेल व थेट ठिबकवर लागवड करायची असेल, तर त्यांनी वरील लागवडीचे अंतर निश्चित करावे. प्रत्येकी दोन सशक्त टपोऱ्या बियांची लागवड करायची आहे. यात बीएसएमआर ७३६, ८५३ व बीडीएन ७११ किंवा इतर जातीच्या तूर बियाण्यांची प्रतिएकरी सव्वा ते दीड किलो प्रमाणात लागवड करावी.
ज्यांच्याकडे कमी पाणी आहे त्यांनी झाडाखाली किंवा शेडनेटच्या सावलीत ४ बाय ६ सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत बिया लावाव्यात. त्यासाठी एकरी चार ते पाच हजार पिशव्या लागतात. त्यात दहा ते पंधरा टक्के वाढवून रोपे जादा तयार करवून घ्यावीत. जेणेकरून जिथे तुटाळ होईल तिथे वाढवलेली रोपे लावता येतील. जेणेकरून सर्व रोपांची एकसमान वाढ होऊन एकरी झाडांची संख्याही योग्य ठेवता येईल. त्यासाठी प्रथम वड किंवा आंब्याच्या झाडाखालची पोयट्याची निचरा होणारी माती घ्यावी. त्यात ट्रायकोडर्मा मिसळून पिशव्या भरून घ्याव्यात. सर्व पिशव्या ओळीने लावून घ्याव्यात. त्यात एक ते दीड इंच खोलीवर प्रतिबॅग दोन टपोऱ्या बिया टोकण करून घ्याव्यात. हे नियोजन साधारण पेरणीपूर्वी २५ ते ३० दिवस अाधी म्हणजे १५ जूनच्या दरम्यान होईल असे गृहीत धरले, तर किमान २० मे रोजी पिशव्यात बिया टोबाव्यात. त्यास रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. सावलीत वाळवून मगच बियाणे लावावे. त्याला झारीने पूर्ण पिशवी भिजेल असे पाणी द्यावे. त्यानंतर प्रती दोन ते तीन दिवसांनी झारीने हलके पाणी देत जावे. बियाणे उगवून आल्यावर पिशवीतील तण काढावे.
रोपांची उंची १५ ते २० सेंटिमीटर व ते रोप २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर त्याची पुनर्लागवड करावी. मुख्य शेतात सोयाबीन, मूग, उडीद, कापूस पेरून झाल्यावर चार ते पाच ओळीनंतरची एक ओळ रिकामी ठेवावी. त्या ठिकाणी पिशवीतील रोपे पिशवी व्यवस्थित उभी कापून पाच ते सहा इंच खोलीचा खड्डा तयार करावा. त्यात अलगद रोपे लावून माती व्यवस्थित दाबून घ्यावी. त्यापूर्वी प्रत्येक खड्ड्याच्या जागी दहा ते पंधरा ग्रॅम डीएपी टाकून घ्यावे.
रोपे नर्सरीत किड्याने कुरतडू नये, म्हणून त्यात फोरेट दाणेदार प्रतिबॅग दोन ते तीन दाणे टाकून घ्यावे.

बाकी कुठली फवारणी करण्याची किंवा खते देण्याची सहसा गरज नाही. पाऊस मोठा होणार असल्याची शक्यता वाटताच शेडनेटवर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. जेणेकरून पावसाच्या माऱ्याने रोपे कोलमडणार नाहीत. अशा तऱ्हेने एका एकरच्या हिशेबाने इतर क्षेत्रासाठी बॅग्जची संख्या वाढवून घ्यावी. पुनर्लागवडीनंतर व्यवस्थापन चांगले ठेवावे. पिकाची चांगली व सशक्त वाढ झाल्यास ३० व ६० दिवसांनी दोनदा शेंडा खुडावा.

(लेखक लातूर येथे कृषी अधिकारी अाहेत.)
संपर्कः ९४२२६१०७७५

मेरे बारे में

Niteen veer
मेरा पूरा प्रोफ़ाइल देखें

ब्लॉग आर्काइव

  • ►  2025 (1)
    • ►  मई (1)
  • ▼  2016 (1)
    • ▼  मई (1)
      • wel come
सरल थीम. Blogger द्वारा संचालित.